पोलीस, महापालिका कर्मचारी योद्धेच 

नगर  -करोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनच्या काळातही प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काम एखाद्या योद्‌ध्यापेक्षा कमी नाही. अशा काळात त्यांच्याही जीवाची सर्वांनीच काळजी करायला हवी, अशी भूमिका जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या नगर शाखेचे अध्यक्ष गौतम मुनोत यांनी व्यक्त केली.

जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनंतर जितोच्या शाखेतर्फे पोलिस दल आणि महापालिकेलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी दर्जेदार फेसशिल्ड व ग्लोव्हजची भेट दिली. पुढील पाच दिवसांत आणखी 7 हजार फेसशिल्ड मास्क व सुमारे 5 हजार ग्लोव्हजचे वितरण करण्याची ग्वाही देखील यावेळी दिली.
महापालिका, साफसफाईसह अत्यावश्‍यक सेवा देत आहेत. त्या सर्वांकडेच आरोग्य रक्षक साधनांची कमतरता आहे. त्यामुळे त्या सर्वांनाच आरोग्य रक्षणासाठी फेसशिल्ड व हॅण्डग्लोव्हज देण्यासाठी “जितो’च्या नगर शाखेतर्फे पुढाकार घेण्यात आला.

“जितो’तर्फे देण्यात आलेली ही सुविधा महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार तसेच गृह विभागाच्या पोलिस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. अध्यक्ष गौतम मुनोत यांच्यासह सचिव अमित मुथा, जवाहर मुथा, आलोक मुनोत, केतन मुनोत यावेळी उपस्थित होते. आयुक्त मायकलवार यांनी जितोच्या याकामाचे कौतुक केले. अत्यावश्‍यक असेलले फेसशिल्ड व ग्लोव्हज देवूून जितो संघटनेने काम करणाऱ्या यंत्रणेला महत्वाचे पाठबळ दिले आहे. अशी भूमिका मांडली. नागरीकांनी घरातच राहून या कार्यात मदत करावी, अशी विनंतीही केली.

अध्यक्ष मुनोत यांच्यासह सचिव अमित मुथा, सुरेंद्र गांधी, आशिष मुनोत, सौरभ भंडारी, तुुषार कर्नावट, नीलेश चोपडा, कमलेश गुगळे, किशोर मुुनोत, आलोक मुनोत, केतन मुनोत, सतीश मुथा, मनोज भटेवरा, निरल गुगळे, जयकुमार काका, सचिन गांधी,जवाहर मुथा, विजय गुगळे, मयुुर गांधी, निलेश भंडारी, राजेश कटारिया, गौरव फिरोदिया, सचिन मुनोत, सोनल चोपडा, गौतम मुथा, महेश मुथियान, प्रितेश दुगड, दिनेश ओस्तवाल यांनी आर्थिक सहयोग दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.