मुबई : कोरोना विषाणूपासून बचावासाठी राज्यातील पोलिसांना नवीन सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले. या अभियानाची सुरवात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. या संचामध्ये पोलिसांचा संपूर्ण चेहरा झाकला जाईल अशी सुरक्षा करण्यात आली आहे.
गृहमंत्री श्री @AnilDeshmukhNCP यांच्या हस्ते आज #मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीसांसाठी सुरक्षा साधन संचाचे (किट) वाटप करण्यात आले.#लॉकडाऊन काळात राज्यातील पोलीस उत्तम कार्य करीत असून #कोरोना संसर्गाचा मुकाबला करताना पोलीसांनी स्वत:च्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी-गृहमंत्री pic.twitter.com/4MeXYJPVzn
— महाराष्ट्र परिचय केंद्र (@MahaGovtMic) April 4, 2020