लखनऊ : कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. मी कारमधून उतरताच उत्तर प्रदेश पोलिसांनी माझा गळा दाबला. माझ्यासोबत पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा दावा त्यांनी केला. त्या आज सेवानिवृत्त आईपीएस अधिकारी एस.आर. दारापुरी यांच्या परिवाराला भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना पोलिसांनी लोहिया चौकात रोखले.
#WATCH: Congress' Priyanka Gandhi Vadra says,"UP police stopped me while I was going to meet family of Darapuri ji. A policewoman strangulated&manhandled me. They surrounded me while I was going on a party worker's two-wheeler,after which I walked to reach there." pic.twitter.com/hKNx0dw67k
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 28, 2019
प्रियांका म्हणाल्या की, “मी कारमधून खाली उतरताच पोलिसांनी मला वेढा दिला . एका पोलीस अधिकारी महिलेने माझा गाळा दाबून मारहाण केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रियांका गांधी यांनी तीन किलोमीटरचा पायी प्रवास केला.
दारापुरीच्या कुटुंबीयांची भेट घेल्यानंतर प्रियंकाने पत्रकारांना सांगितले की, “मी शांतपणे गाडीत जात होतो, मग कायदा व सुव्यवस्था कशी बिघडणार?” मी येणार आहे असे कोणालाही सांगितले नव्हते. मी पायी चालत असताना मला थांबविले गेले. पोलिसांचा मला थांबवण्याचा अधिकार नाही.
दरम्यान नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सेवानिवृत्त आईपीएस अधिकारी एस.आर. दारापुरी यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली होती. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.