बारामतीच्या 13 गावांत पोलीस ताफ्याचे संचलन

डोर्लेवाडी  – बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांनी शनिवारी (दि. 12) बारामती तालुक्‍यातील झारगडवाडी, सोनगाव, खताळपट्टा, मेखळी, निरावागज, घाडगेवाडी, खांडज, शिलवली, माळेगाव, काटेवाडी, कन्हेरी, सावळ, रुई या गावात रूट मार्च आणि पथसंचलन केले.

बारामती तालुक्‍याचे एक पोलीस निरीक्षक, एक उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी 60 तसेच ओरिसा राज्यांचे एक पोलीस उपअधीक्षक, चार पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी 67 असे एकूण 134 जण यात रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते, अशी माहिती बारामती तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायणराव पवार यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.