पुणे – लग्नानंतर पोलीस पतीचे महिलांसोबत असलेल्या अनैतिक संबंधाची माहिती मिळाल्यानंतर पत्नीने घरातील फिशेल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना स्वारगेट पोलीस वसाहत परिसरात घडली. याप्रकरणी पोलीस पती, सासू व नणंदे विरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे शहर पोलीस दलात फिर्यादी महिलेचे पती कार्यरत असून त्यांची मुख्यालयात नेमणूक आहे. महिला व आरोपी पोलीस यांच्यात प्रेमसंबंध झाल्यामुळे त्यांनी 2009 मध्ये लग्न केले.
लग्नानंतर महिलेला तिच्या पतीचे बाहेरील दोन-तीन महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. याचा जाब विचारला असता पतीने पत्नीला मारहाण केली. त्यानंतर पतीने पोलीस वसाहतीत राहत असलेल्या घरातील संसार उपयोगी साहित्य व दोन मुलींसह लहान मुलाला घेऊन पत्नीला एकटे सोडून दुसरीकडे राहण्यास निघून गेले.
आरोपी पतीने फोन उचलणेही टाळले. त्यातून महिलेने मानसिक तणावाखाली येऊन फिनेल प्राशन केले. तर, आरोपी पोलीस 20 सप्टेंबरपासून कर्तव्यावर नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.