नगर (प्रतिनिधी) – बंदोबस्तावरील पोलीस व वैद्यकीय सुविधा पुरविणाऱ्या डॉक्टर्स, नर्स यांच्याही आरोग्याच काळजी घेणे गरजेचे आहे, असे तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रजपूत यांनी व्यक्त केले.
अहमदनगर भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालया मार्फत जिल्हा संस्थेच्या मास्क बॅंकेत जमा झालेले मास्क स्वीकारताना ते बोलत होते. प्रशासनास 300 मास्क व सॅनिटिरझर तसेच नगर तालुका ठाण्यास 100 मास्क व 25 सॅनिटायझर सुपूर्द करण्यात आले. भिंगार पोलिस ठाणे, जिल्हा रुग्णालयात मास्क देण्यात आले. जिल्हा मुख्य आयुक्त काशिनाथ बुचुडे, जिल्हा आयुक्त गाईड संगिता लांडगे, स्काऊट कैलास मोहीते उपस्थित होते.