माजी उपमहापौरांसह पाच जणांना पोलीस कोठडी

पिंपरी: राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये सोमवारी दुपारी पिंपरी येथे तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी खुनी हल्ल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांच्यासह दोन्ही गटातील पाच जणांना अटक केली आहे. मंगळवारी न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची कोठडी सुनावली आहे.

हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी (वय 51, रा. पिंपरी) प्रशांत बाबू मंदू (वय ३४) अशी अटक केलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची नावे आहेत. तर शिवासेनेच्या बबलू सोनकर (वय 40), जितू मंगतानी (वय 32), लच्छू बुलाणी (वय 55, सर्व रा. पिंपरी) यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

त्यांच्यावर खुनी हल्ल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल आहेत. सोमवारी निवडणुकीच्या दिवशी राजकीय वैमनस्यातून दोन्ही गटांनी एकमेकांवर खूनी हल्ले केले. त्यानंतर पोलिसांनी पाच जणांची धरपकड केली.

अटक केलेल्या आरोपींना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना पाच दिवस २७ ऑक्टोबर) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.