पुणे – शहर पोलिस दलातील एका 57 वर्षीय सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा करोनामुळे मृत्यू झाला. जनार्दन रामचंद्र चिखले असे मृत्यू झालेल्या पोलिसाचे नाव आहे. ते हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. 18 सप्टेंबर रोजी चिखले यांना करोना संसर्ग झाला होता. त्यांच्यावर बाणेर येथील एका रुग्णालयात उपाचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान शहर पोलीस दलात आत्तापर्यंत करोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाला.
मार्च महिन्यापासून कंबर कसुन सगळी पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. अनेकांना संकटातून वाचवलं. मात्र आता तीच पोलीस यंत्रणा संकटात आली आहे. कार्यरत असताना अनेक पोलीसांना कोरोनाची बाधा झाली तर अनेकांचा मृत्यू झाला.
दरम्यान, पोलीस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा सतत कार्यरत आहे. कोरोनाची बाधा सतत वाढत आहे. त्यामुळे आता या यंत्रणेची सुरक्षा नागरिकांच्या हाती आहे.