पाकिस्तानात लस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर पोलीस कारवाई; कराचीमध्ये 33 जणांना अटक

इस्लामाबाद – पाकिस्तानात करोनालस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर थेट पोलीस कारवाई होत आहे. त्यातून कराचीमध्ये 33 नागरिकांना अटक करण्यात आली.

पाकिस्तानमधील सिंध प्रांताच्या सरकारने लसीकरणाबाबत आग्रही आणि आक्रमक भूमिका घेतली आहे. लस न घेणाऱ्यांना अटक करण्याचा आणि 10 लाख रूपयांचा दंड ठोठावण्याचा आदेश प्रांतिक सरकारने जारी केला आहे. दंडाची वसुली मालमत्ता जप्तीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

आदेशानंतरही पोलीस कारवाई करत नसल्यामुळे त्या सरकारकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कराची शहरात तपासणी मोहीम हाती घेतली. त्यावेळी लसीकरण प्रमाणपत्र दाखवू न शकलेल्यांना अटक करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने तरूणांचा समावेश आहे. लसीकरणाविषयी माहितीच नसल्याने लस न घेतल्याचे कारण त्यांनी दिले. त्यातून पाकिस्तानमधील अनागोंदी आणि भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला.

जगातील बहुतांश देशांप्रमाणे पाकिस्तानलाही करोना संकटाचा तडाखा बसला आहे. इतर देश करोना संकटावर मात करण्यासाठी वेगाने लसीकरण मोहीम राबवत आहेत. मात्र, कमकुवत आरोग्य यंत्रणेमुळे पाकिस्तान त्या मोहिमेतही पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.