पुण्यातील कोरोनाबाधित पोलिसांशी आयुुक्तांनी साधला संवाद

पुणे- पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या सतत वाढत आहे. त्यात  महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव सातत्यानं होताना दिसतो आहे. भारतात पुणे हे गेले सहा महिने झालं तरी हाॅटस्पाॅट मानलं जाते आहे.

पुणे शहरात करोनाचा संसर्ग वाढत आहे. पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालय आणि होम क्वारंटाईन करून उपचार सुरू आहेत. दरम्यान, बुधवारी नवनियुक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बाधित अथवा करोनावर मात केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधला. उपचार घेणाऱ्यांचे तुम्ही लवकर बरे व्हाल असे सांगून मनोबलही वाढविले.

दरम्यान, पुणेकरांनी  सगळ्या नियमांचं पालन करत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे. जम्बो कोव्हिड सेंटरमधील घोळ अजून निस्तरला नाही आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही कमकुवत होण्याची शक्यता निर्माण होऊ देऊ नका, असं आवाहन सरकार सातत्यानं करताना दिसते आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.