पोलीस आयुक्‍तालयाच्या मागण्यांची लवकरच पूर्तता!

दोन्ही आयुक्‍तालयाच्या शीत युद्धावर मात्र चुप्पी

पुणे व पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील मनुष्यबळ व गाड्या वर्गीकरणावरुन गेल्या आठ महिन्यांपासून जे शीत युद्ध सुरु आहे त्याबद्दल विचारणा केली असता जे जुने झाले त्या बद्दल माहिती नाही, मी नवीन आहे. या पुढे असे काही होणार नाही, असे म्हणत जयस्वाल यांनी या विषयावर बोलणे टाळले. शेवटी महासंचालक कार्यालयाकडूनच गाड्या व वाहने देण्याचेही या बैठकीत ठरले. त्यामुळे या महासंचालकांनाही दोन्ही आयुक्‍तालयांचा तिढा सोडवणे काही शक्‍य झाले नाही, हे यातून स्पष्ट झाले.

पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्या मनुष्यबळ, वाहन व इतर मुलभूत गरजा आहेत, त्या लवकरच पूर्ण कऱणार आहोत. लोकसभा निवडणुकानंतर या हालचालींना वेग दिला जाईल, असे आश्‍वासन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी दिले.

जयस्वाल यांनी मंगळवारी (दि.16) चिंचवड येथील पोलीस आयुक्‍तकार्यालयाला भेट देत आयुक्‍तालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी पोलीस महासंचालक कार्यालयाच्या वतीने 14 इर्टिगा कार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाला देण्यात आल्या. यावेळी पोलीस आयुक्‍त आर.के.पद्मनाभन, अप्पर आयुक्‍त मकरंद रानडे, तीनही पोलीस उपायुक्‍त यांच्या उपस्थितीत महसंचालकांची बैठक झाली.

बैठकीनंतर महासंचालकांनी पत्रकारांशी थेट संवाद साधताना सांगितले की, आयुकालयाला जी जागा आवश्‍यक आहे त्यासाठीही महापालिका व राज्य शासन यांच्याशी चर्चा करुन लवकरच मिळवली जाईल. याशिवाय आयुक्‍तालयाच्या कामाविषयी माहिती घेतली असता कमी मनुष्यबळातही आयुक्तालयाचे कामकाज हे उत्तम सुरु आहे, असे समाधनही त्यांनी व्यक्‍त केले.

मनुष्यबळ व गाड्यात होणार भरीव वाढ पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयाला येत्या काळात महासंचालक कार्यालयाकडून शंभर गाड्या नव्याने खरेदी करुन दिल्या जातील. ज्यामध्ये दुचाकी, बस व इतर गाड्यांचा समावेश असणार आहे. तसेच 1 हजार 200 मनुष्यबळ मिळणार आहे. त्यामध्ये 800 कर्मचारी हे थेट महासंचालक कार्यालयाकडून तर 400 कर्मचारी ही आतंर जिल्हा बदलीद्वारे आयुक्‍तालयाला मिळणार आहेत. याच बरोबर आणखी दोन पोलीस उपायुक्‍तही मिळणार आहेत.

नियंत्रण कक्षाला अचानक भेट

पोलीस महासंचालक यांनी आयुक्त पद्मनाभन यांच्याकडून फोन अ फ्रेंन्ड, क्‍विक ऍक्‍शन टीम या उपक्रमांची माहिती घेतली व ते थेट नियत्रंण कक्षात गेले. यावेळी त्यांनी नोंदणी वहीतील एका कॉलची पडताळणी देखील केली. या पडताळणीनंतर महासंचालकांनी आयुक्‍त व टीमचे कौतुक केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.