पुणे – हवेली तालुक्यातील कोंढवा बुद्रुक येथे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेची प्रशासन आणि पोलिसाकडूनही चौकशी केली जाणार आहे तसेच, या संपूर्ण घटनेत जबाबदार व्यक्तींला लवकरच अटक करण्यात येणार आहे. असे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी सांगितले.
Pune police commissioner K Venkatesham on wall collapse in Kondhwa: Our team is investigating the reasons behind the incident. Firm action will be taken against those responsible. We will check whether proper permissions were taken and safety measures were followed. #Pune pic.twitter.com/bdl0RLi1Nu
— ANI (@ANI) June 29, 2019
दरम्यान, पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदना व्यक्त केली असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. तसेच या दुर्घटनेतील मृत्यूला बिल्डर आणि महापालिकेचे अधिकारी दोषी आहेत असा आरोप माजी आमदार महादेव बाबर यांनी केला आहे. तर महापौर मुक्ता टिळक, मनसेचे गटनेते वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.