पुणे – शहरात सध्या करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी संचारबंदी करण्यात आली आहे. अशावेळी विनाकारण वाहने घेऊन घराबाहेर पडू नये असे पोलीस प्रशासन आवाहन करत आहे. तरीदेखील वाहनचालक नियमांचे उल्लघंन करून रस्त्यावर येत असल्याचे निर्दशनास येत आहे.
अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त रस्त्यावर येणारी वाहने यापुढे जप्त करण्याची कारवाई पोलीस करत आहेत. अत्यावश्यक सेवा असणाऱ्या वाहनधारकांना पोलीसांकडून पासेस देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त अन्य वाहनचालकांवर पोलीस कारवाई करत असून आज स्व:ता मा. पोलिस आयुक्त रस्त्यावर उतरून पास नसणाऱ्या वाहन चालकांच्या गाड्या जप्त करीत आहेत. त्यामुळे सध्या कडक कारवाई सुरु आहे असे दिसून येत आहे.