सीबीआयच्या रडारवर कोलकत्याचे पोलीस प्रमुख : ममता संतप्त

जगातील सर्वोत्तम अधिकाऱ्यांपैकी एक असल्याचे प्रशस्तीपत्र

कोलकता : कोलकत्याचे पोलीस प्रमुख राजीव कुमार हे चिट फंड घोटाळ्यांवरून चक्क सीबीआयच्या रडारवर आले आहेत. मात्र, त्यांच्या मागे सीबीआयचा ससेमिरा लागल्यावरून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संतप्त झाल्या आहेत. कुमार यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहताना ममतांनी ते जगातील सर्वोत्तम पोलीस अधिकाऱ्यांपैकी एक असल्याचे प्रशस्तीपत्र दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रोझ व्हॅली आणि शारदा चिट फंड घोटाळ्यांवरून सीबीआयने कुमार यांना समन्स बजावले आहे. मात्र, ते फरार असून त्यांचा ठावठिकाणी शोधला जात असल्याचे सीबीआयने शनिवारी म्हटले. मात्र, कुमार फरार असल्याचा सीबीआयचा दावा कोलकाता पोलिसांनी फेटाळून लावला. कुमार फरार असल्याचे वृत्त निराधार आहे. ते कोलकत्यातच असून नियमितपणे कार्यालयात येत आहेत. केवळ 31 जानेवारीला ते एक दिवस रजेवर होते, असे निवेदन कोलकता पोलिसांकडून जारी करण्यात आले.

कुमार यांना सीबीआयने समन्स बजावल्यावरून निर्माण झालेल्या वादात उडी घेताना ममतांनी केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपवर टीकेची झोड उठवली. भाजपचे केंद्रीय नेतृत्व राजकीय सूडाचे अतिशय घाणेरडे राजकारण करत आहे. भाजपच्या निशाण्यावर केवळ राजकीय पक्ष नसून आता पोलीस दलाचा ताबा मिळवण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे. कुमार यांच्याबद्दल भाजप खोटी माहिती पसरवत आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कुठलीही शंका घेतली जाऊ शकत नाही, असे ममतांनी म्हटले.

भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी असणाऱ्या कुमार यांनी जानेवारी 2016 ला कोलकत्याच्या पोलीस आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारली. चिट फंड घोटाळ्यांच्या तपासासाठी पश्‍चिम बंगाल पोलिसांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) नेतृत्व त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)