वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शंकर मुटेकर यांनी एकास दिले जीवदान
नीलकंठ मोहिते/ रेडा, प्रतिनिधी: पोलीस म्हटलं की मनामध्ये वेगळीच शंका ग्रामीण भागात चुकीची ऐकायला मिळते. मात्र सामाजिक जाणिवेतून महामार्ग पोलिस मदत केंद्रावर कार्यरत असणारे पोलीस अधिकारी आपण घेतलेले प्रशिक्षणाचा पुरेपूर उपयोग करत अनेकांना जीवदान देतात. असेच जीवदान डाळज (तालुका इंदापूर)येथील महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक शंकर मुटेकर यांनी विश्वनाथ जगताप या 65 वर्षीय वृद्धाला दिले. जगताप हृदयविकाराचा झटक्यापासून पंपिंग करून वाचवले. त्यामुळे एका गरीब कुटुंबातील नागरिकाला जीवदान मिळाले आहे.
यासंबंधी अधिक माहिती अशी की, 29 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास महामार्ग पोलिस मदत केद्र इंदापुर जि.पुणे येथील शंकर मुटेकर व पो.स्टाफ नलावडे, गळवे, वाघ, मिसाळ यांचे सह पेट्रोलिंग पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर करत असताना डाळज नं. 1 (ता.इंदापुर) येथे रस्त्याचे कडेला शेळया राखणारे शेतकरी विश्वनाथ दिनकर जगताप वय 65 वर्ष यास हदयविकाराचा झटका आला. त्यांना रस्त्याच्या बाजुला पडलेले पाहून पोलीस उपनिरीक्षक शंकर मुटेकर यांनी पहिले. सदर इसम हा बेशुध्द झालेला असल्याने मुटेकर यांनी त्यांच्या छातीवरती तात्काळ पंम्पिग सुरु केल्याने सदर इसम हा काही वेळातच शुध्दीवरती आला.
विश्वनाथ जगताप शुद्धीवर येताच त्याठिकाणी असलेल्या लोकांच्या व पोलिस स्टाफच्या मदतीने भिगवण आयसीयू सेंटर या हाँस्पीटलमध्ये त्यांना हलविण्यात आले. त्यांच्यावर औषध उपचार चालू असून यापूर्वी या शेतकऱ्यांची एन्जोप्लास्टी झालेली होती. जर संबंधित पोलीस उपनिरीक्षक यांनी आपणास दिलेले प्रशिक्षण याठिकाणी कामी आणले नसते तर गरीब कुटुंबातील या शेतकऱ्याला देवा घरी जावे लागले असते. परंतु धाडस करून पोलीस उपनिरीक्षक यांनी जी मदत केली त्यामुळे एका कुटुंबाचा आधार टिकला आहे. डाळज गावकऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षक शंकर मुटेकर यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
यासंदर्भात माहिती देताना पोलीस उपनिरीक्षक शंकर मुटेकर म्हणाले की, नाशिक एमपीए येथे एडीजी साहेब वाहतुक यांचे आदेशाने एचएसपी अधिका-यांचे वाहतुक सबंधीचे जे प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्यात आम्हाला हार्ट अटँकचा झटका आल्यास सदर इसमाचे छातीवरती पंम्पिग कसे करुन त्यास शुध्दीवरती आणायचे. हे शिकविले होते. त्याच प्रशिक्षणामुळे मी आज एका शेळया राखणा-या इसमास वाचवू शकलो. हे सर्व आम्हाला दिलेल्या प्रशिक्षणामुळे शक्य झाले आहे, अशी माहिती मुटेकर यांनी दिली.