पुणे : फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पुण्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणार्या आणि मास्क न लावणाऱ्या लोकांवर सक्त कारवाई केली जात आहे. यामध्ये मास्क न लावणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाला दिले आहेत.
त्यामुळे पोलिस प्रशासनला विनामास्क फिरताना पहिल्यांदा कोणी आढळल्यास पाचशे रुपये आणि तोच नागरिक विनामास्क पुन्हा आढळला, तर त्याच्याकडून हजार रुपये दंड किंवा कलम 188 नुसार गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो. मात्र तरी सुद्धा नागरिकांमध्ये कोरोना बाबत गांभीर्य दिसून येत नाही. कारण अजून ही नागरिक सरास मास्क न लावता फिरताना आढळून येत आहेत.
तत्पूर्वी प्रशासनाने चाचण्या आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवल्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ आढळून येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने 14 मार्च पर्यंत शाळा महाविद्यालय बंद ठेवली आहेत. तरी सुद्धा सातत्याने रूग्णसंख्येत वाढ होत आहे. त्याचबरोबर दुसर्या बाजूने लस देण्याची मोहिम जोरदार सुरू देखील आहे.
परंतु अजून ही कोरोनावर राज्य सरकार आणि आरोग्य विभागाला नियंत्रण मिळवता आलेले नाही. मात्र तरी सुद्धा महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाकडून मास्क न लावणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणार्या नागरिकांवर कारवाई करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.