पारनेर (प्रतिनिधी) -पारनेर तालुक्यातील निघोज येथील मळगंगा कुंडाजवळील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला जुगार खेळत असलेल्या दहा जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निघोज येथे जुगार खेळत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली. त्यानुसार येथे छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी रोहिदास रामचंद्र वराळ, विश्वास रामचंद्र लंके, किसन नामदेव वराळ, प्रदीप मारुती जाधव, शिवाजी विष्णू वराळ, आकाश विजय वराळ, धोंडीभाऊ महादू जाधव, सतीश आनंदा पथवे, सचिन कृष्णा रोहकले, दत्तात्रेय रामचंद्र वराळ (सर्व रा. निघोज) हे सर्वजण तिरट नावाचा हार जितीचाजुगार खेळताना आढळून आले. यावेळी रोख रक्कम दोन हजार 900 व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदीचा आदेश भंग केल्याप्रकरणी पो. कॉ. रवींद्र पांडुरंग पाचारणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. व्ही. गुजर हे करत आहेत.
जुगाऱ्यांवर कारवाईची मागणी
करोना काळामध्ये तालुक्यातील अनेक गावांमध्ये जुगार मोठ्या प्रमाणात खेळली जात आहे. लाखो रुपये यामध्ये जुगारी घालवत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता जुगार खेळणाऱ्यांविरोधात मोहीम राबवण्याची गरज आहे, अशी भावना तालुक्यातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे