पालघर : गेल्या महिन्यात पोलिसांवर गावठी बॉम्ब फेकून पळून जाणाऱ्या इसमाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.संतोष शेंडे असे या इसमाचे नाव आहे. त्याला एका व्यक्तीवर हल्ल केल्याच्या कारणावरून पोलिस पकडण्यासाठी गेले असताना त्याने पोलिसांवर गावठी बॉम्ब फेकून तेथून पोबारा केला होता.
ही घटना 19 डिसेंबरला घडली होती. तथापी त्याने फेकलेल्या बॉम्ब मुळे पोलिसांपैकी कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र त्याला पकडण्याचे प्रयत्न अपयशी ठरले होते. सुमारे 12 दिवस पोलिसांना गुंगारा देण्यात तो यशस्वी ठरला होता पण आज अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यावर सरकारी सेवकांवर केलेला हल्ला, तसेच बेकायदेशीर स्फोटके बाळगल्याच्या कारणावरून विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.