सोमेश्वरनगर – करोना संसर्ग भारत कशा प्रकारे रोखतो याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.अशातच पुण्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जास्त असल्याने पुण्याकडे सर्वाधिक लक्ष आहे. याच पार्श्वभूमीवर वडगाव निंबाळकर पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या आदेशानुसार बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाने अध्यक्ष महेश जगताप यांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन केले होते.
मात्र तरीही दुकाने चालु असल्याचे निदर्शनास आल्यावर करंजेपुल पोलीस कर्मचारी ,पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ऍड. गणेश आळंदीकर,विनोद गोलांडे ,तुषार धुमाळ , ग्रामस्थ साधू गायकवाड, शरद जगताप यांनी दुकानदारांना गुलाबाचे फुल देवुन गांधीगीरी करत कोरोना बाबत काळजी घेण्यासाठी दुकाने बंद ठेवण्यासाठी विनंती केली आहे.