पोलीस प्रशासनाचे शेतकऱ्यांना सहकार्य

पोलीस अधीक्षक सिंधू : शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा
नगर –
राज्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर काय प्रश्‍न आहेत. वारंवार शेतकरी आंदोलन का? करतात. पोलीस आणि शेतकऱ्यांचा रस्त्यावर संघर्ष का होतो? शेतकऱ्यांवर लाठी चार्ज पासून गोळीबारापर्यंत का वेळ येते? हे सर्व जाणून घेण्यासाठी पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी शेतकरी प्रश्‍नावर काम करणाऱ्या सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेवून आढावा घेतला.

यावेळी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने अजय बारस्कर, संतोष पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवी मोरे, बापूराव आढाव, अभिजित पोटे, शरद जोशी, संजय तोडमल, बच्चू मोडवे, जगन्नाथ कोरडे, सत्यवान शिंदे, दत्ता झरेकर, शुभम काकडे, तसेच इतर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी साखर कारखानदार शेतकऱ्यांना एफआरपी देत नाही, दुधाला भाव मिळत नाही. भेसळीचे दूध मोठ्या प्रमाणात बाजारात आणले जाते. आणि गाईच्या, म्हशी खरा दुधाचा भाव पडला जातो. तसेच बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना कमी भाव दिला जातो.
तसेच महावितरणकडून 48 तासात रोहित्र बदलून दिले जात नाही.

गोवंशहत्या बंदी, बीटी बियाणे बंदी, शेतकरी विरोधी कायदे, कांदा, डाळी तसेच विद्युत पंपाच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचे शेतकरी संघटणेच्या वतीने सांगण्यात आले. प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने अजय बारस्कर यांनी सांगितले की, पोलीस प्रशासनाचे शेतकऱ्यांना नेहमीच सहकार्य असते. व यापूढे राहणार आहे. व शेतकऱ्यांचा कुठला ही प्रश्‍न असो त्यांनी थेट पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधवा असे आवाहन पोलीस अधीक्षक सिंधू यांनी केले असल्याचे बारस्कर यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.