पोलिसांची कारवाई : सिक्कीम आणि नेपाळच्या दोघींची सुटका

ऑनलाइन वेश्याव्यवसायाचे रॅकेट उघडकीस

पुणे -शहरात सुरू असलेल्या ऑनलाइन वेश्या व्यवसायाचे रॅकेट उघडकीस आणत पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने दोन तरुणींची सुटका केली.

 

याप्रकरणी पवित्रकुमार महतो, दिलीपकुमार महतो, सचिनकुमार मंडल, अनिलकुमार मंडल (सर्व रा. वाकड, मूळ झारखंड) यांना अटक केल्याचे पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांनी सांगितले आहे.

 

पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके व पोलीस हवालदार संतोष भांडवलकर यांना माहिती मिळाली होती की,व्हिवास्ट्रीट या वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन एस्कॉर्टद्वारे वेश्याव्यवसाय करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधित वेबसाइटवरील क्रमांकावर बनावट ग्राहकाद्वारे संपर्क साधला. त्यानुसार नोवेटल हॉटेलच्या गेटवर रामवाडी, येरवडा येथे वेश्याव्यवसायासाठी पाठविण्यात आलेली एक नेपाळी मुलगी आढळली. तिला पोलिसांनी ताब्यात घेत तिच्याकडे चौकशी केली असता तिचे सांगण्यावरुन आणखी एक सिक्कीमची तरुणी सापडली.

पोलीस शिपाई पुष्पेंद्र चव्हाण यांनी तांत्रिक विश्लेषणाचे मदतीने वाकड येथे जाऊन सदर मुलींकडून वेश्याव्यवसाय करुन घेणाऱ्या चौघांना जेरबंद केले. येरवडा पोलीस ठाण्यात त्यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.