कराड व उंब्रज येथे कारवाई
कराड/उंबज (प्रतिनिधी) – कराडमध्ये छप्या पध्दतीने मटणाची विक्रीकरुन संचारबंदी आदेशाचे उल्लंघन आणि चढ्यादराने मटण विक्री केल्या प्रकरणी कराडच्या चौघांवर तर उंब्रजमधील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साजीद चाँद शेख व विक्रम शिवाजी माने (दोघेही रा. दौलत कॉलनी, कराड), जुनेद मुल्ला व मोबीन निकार कुरेशी (रा. मटण मार्केट, गुरुवार पेठ) तर सुरज शब्बीर मुल्ला रा. वडगाव ता. कराड जि. सातारा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिासांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणात उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात संचारबंदी लागू असून मटण विक्रीला बंदी आहे. मात्र, गर्दी करून चढ्यादराने रविवार दि. 29 रोजी शहरातील साजीद चाँद शेख व विक्रम शिवाजी माने, जुनेद मुल्ला व मोबीन निकार कुरेशी यांनी मटण विक्री करुन संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केले. पालिकेच्या आरोग्य कर्मचार्यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंधितांवर गुन्हा झाला आहे.
दरम्यान, संचारबंदी व आपत्ती निवारण कायद्याचा आदेशाचा असताना चिकण मटण विक्री करण्यासाठी बंदी असताना वडगाव ता. उंब्रज येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे पाठीमागे रस्त्याच्या कडेला मटण विक्री करत होता. संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.