सोलापुरात खासदार सुप्रिया सुळेंच्या ताफ्यातील गाड्यांवर पोलिसांची कारवाई

सोलापूर – वाहतूकीला अडथळा केल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर सोलापुरात पोलिसांनी आज कारवाई केली. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचा सोलापूर दौरा सुरू आहे. याच दौऱ्यात विविध क्षेत्रातील लोकांशी त्या संवाद साधत आहेत. संध्याकाळी सात वाजता सोलापुरातील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात ‘संवाद ताईंशी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सुप्रिया सुळे ज्या गाडीत आल्या होत्या. त्या गाडीसह ताफ्यातील सर्व गाड्यांवर वाहुतकीला अडथळा केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

डफरीन चौक हा रहदारीचा भाग आहे. मात्र रस्त्यालगत असलेल्या सभागृहामुळे रस्त्यावर ताफा उभा करण्यात आला होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. हा सर्व प्रकार वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ताफा रस्त्यावरून हलवण्याच्या सूचना केल्या.

मात्र त्यानंतरही ताफा न हलल्याने ताफ्यातील सर्व 8 गाड्यांवर पोलिसांनी कारवाई केली. मोटर वाहन कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली. यामध्ये प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नावाने नोंदणी असलेल्या गाडीचाही समावेश आहे. रस्त्यावर होत असलेल्या अडथळ्यामुळे गाड्यांवर कारवाई केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली तर पोलिसांना पूर्वपरवानगी दिली होती.

तसेच हॉलच्या जवळ कुठेही पार्किंगची व्यवस्था नव्हती. परवानगी असताना ही कारवाई जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×