अकोला: सध्या सर्वत्र शेतातील पिकांवर फवारणी करण्याची कामे सुरु आहेत. परंतु ही फवारणी करत असताना सात शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार अकोले आणि बुलढाणा जिल्ह्यात घडला आहे. सदरील शेतकऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अकोल्यामधील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
शनिवारी सकाळी या शेतकऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या सर्व शेतकऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहित वैद्यकीय सूत्रांकडून समाजली आहे.
यामध्ये अकोला जिल्ह्यातील गोरेगाव, मूर्तिजापूर, बोरगाव आणि अकोला तालुक्यातील चार शेतकऱ्यांचा समावेश आहे, तर बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, नांदुरा आणि संग्रामपूर तालुक्यातील पाच शेतकºयांचा समावेश आहे. विषबाधित शेतकºयांमध्ये अरुण गावंडे, प्रकाश आखरे, ओम ढोले, देवानंद तायडे, अमोल काकडे, गजानन अढाव आणि विजय अढाव या शेतकºयांचा समावेश आहे. सातही शेतकºयांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.