मुंबई – आज विजयादशमीचा मुहूर्त साधत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा आज शिवाजी पार्क मैदानावर पार पडणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडणार आहे. तत्पूर्वी भाजपासून उद्धव ठाकरे आजच्या मेळाव्यात काय बोलवणार याबाबत खोचक टोला लगावण्यात आला आहे.
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काही ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आज उद्धव ठाकरे आपण, शिल्लकसेनेच्या मेळाव्यात तुम्ही गटप्रमुखांच्या बैठकीतील भाषण पुन्हा करणार असे ऐकले. त्यात थोडी भर घालणार असाल, तर काही मुद्दे सुचवू का ? असं म्हणत उपाध्ये यांनी एकूण ६ ट्विट करत काही मुद्द्यावर भाष्य केलं आहे.
आज @OfficeofUT आपण, शिल्लकसेनेच्या मेळाव्यात तुम्ही गटप्रमुखांच्या बैठकीतील भाषण पुन्हा करणार असे ऐकले. त्यात थोडी भर घालणार असाल, तर काही मुद्दे सुचवू का?- 1/6
— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 5, 2022
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना तुम्ही घरात बसून केलेल्या भाषणात लाकुडतोड्याची गोष्ट सांगितली होती. आज कोणती नवी गोष्ट सांगणार? लाकुडतोड्याच्या गोष्टीतला कुऱ्हाडीचा दांडा नेमका कोण हे सांगणार आहात का? कारण तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या अट्टाहासामुळे जनकौल मिळालेली युती तुटली, शिवसेना फुटली, असे बहुसंख्य शिवसैनिकांचे म्हणणे आहे. अट्टाहासामुळे शिवसेना फुटली, याची कबुली देणार का ? असा सवाल उपाध्ये यांनी विचहरला आहे.
तुम्ही सत्तेवर असताना एकही नवा विकास प्रकल्प महाराष्ट्रात आणला नाही. वेदांता फॉक्सकॉनला ‘वाटाघाटी’च्या हट्टापायी घालवलेत. फडणवीस सरकारच्या काळातील अनेक प्रकल्प स्थगिती देऊन बंद पाडलेत. यामुळे महाराष्ट्राचे हजारो कोटींचे नुकसान कोण भरून देणार याचे उत्तर आज देणार का? तुमच्या सत्ताकाळात वसुलीबाज वाजेसारख्यांच्या कारवायांमुळे हजारो नागरिकांचे खिसे कापून पैसा लुबाडला गेला. हे खोके कोणाकडे गेले याचे गुपित आज उघड करणार का? अडीच वर्षांत तुम्ही महाराष्ट्रासाठी केलेली किमान दहा कामे दाखवू शकाल का? ज्यामुळे तुमच्या सत्तेचा जनतेला थेट फायदा झाला? अशा प्रकारचे सवाल केशव उपाध्ये यांनी ट्विटमधून उपस्थित केले आहेत.
अडीच वर्षांत तुम्ही महाराष्ट्रासाठी केलेली किमान दहा कामे दाखवू शकाल का? ज्यामुळे तुमच्या सत्तेचा जनतेला थेट फायदा झाला? 6/6
— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 5, 2022