Mehul Choksi Cancer | पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील फरार आर्थिक गुन्हेगार मेहुल चोक्सी कर्करोगाने ग्रस्त असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात चोक्सीच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे. त्याच्यावर बेल्जियममध्ये उपचार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार 400 कोटी रुपयांचा गंडा घालून मेहुल चोक्सी फरार झाला होता. याशिवाय या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला त्याचा भाचा नीरव मोदी कुटुंबासहसह देशातून पसार झाला. तपास यंत्रणेने सन 2018 च्या फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार, मेहुल चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केलं आहे. या कायद्यानुसार फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यास चोक्सीची जप्त केलेल्या सर्व संपत्तीवर टाच आणण्याची प्रक्रिया तपास यंत्रणेने सुरू केली आहे. याद्वारे त्याची आर्थिक नाकाबंदी करणे शक्य होईल. Mehul Choksi Cancer |
मात्र मेहुल चोक्सीने प्रकृती अस्वस्थ्याचं कारण देऊन तूर्तास भारतात परतण्यास असमर्थ असल्याचं आपल्या याचिकेत म्हटलं आहे.त्यामुळे, मेहुल चोक्सीची भारतात येण्याची प्रक्रिया आणखी काही काळासाठी पुढे गेली आहे. Mehul Choksi Cancer |
मेहुल चोक्सीचा पासपोर्ट रद्द
मेहुल चोक्सीचा पासपोर्ट भारत सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. पीएमएलए न्यायालयात चोक्सीच्या पासपोर्टच्या निलंबनासंदर्भातील कागदपत्रे आणि त्याच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) प्रकरणाच्या तपास फायली मागवण्याचे निर्देशही यापूर्वी देण्यात आले होते. याशिवाय मेहुल चोक्सीशी संबंधित 2565 कोटी रुपयांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची परवानगी पीएमएलए कोर्टानं दिली आहे.
फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा काय?
फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018 नुसार फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणजे एखाद्या व्यक्तीविरुद्ध भारतातील न्यायालयाने नियोजित गुन्ह्यासाठी अटक वॉरंट जारी केले आहे. मात्र तो फौजदारी खटला टाळण्यासाठी भारत सोडून गेला आहे किंवा फौजदारी खटल्याला सामोरे जाण्यासाठी देशात परतण्यास नकार देत आहे. Mehul Choksi Cancer |
नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांनी मिळून पंजाब नॅशनल बँकेत 12 हजार कोटींहून अधिक घोटाळा केला. हे प्रकरण 2018 मध्ये उघडकीस आले होते. घोटाळा उघडकीस आल्यानंतर दोघे देश सोडून पळून गेले.
हेही वाचा:
एलओसीजवळ आयईडी स्फोट; लष्करी अधिकारी, जवानाला जम्मूतील घटनेत वीरमरण