PMUY Update : लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा बसणार फटका; ‘या’ योजनेमध्ये सरकारकडून मोठा बदल
पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या (PMUY Update) देशभरातील १०.५८ कोटींहून अधिक लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी आहे. सरकारने एलपीजी (LPG) सबसिडीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला असून, वार्षिक अनुदानित सिलिंडरच्या संख्येत मोठी कपात केली आहे.

PMUY Update : पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या (PMUY Update) देशभरातील १०.५८ कोटींहून अधिक लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी आहे. सरकारने एलपीजी (LPG) सबसिडीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला असून, वार्षिक अनुदानित सिलिंडरच्या संख्येत मोठी कपात केली आहे.
या नव्या निर्णयामुळे (PMUY Update) गरीब आणि गरजू कुटुंबांचे, विशेषतः घरखर्च सांभाळणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’चे बजेट कोलमडणार असून, लाभार्थ्यांना वार्षिक १५०० रुपयांचा थेट फटका बसणार आहे.
अनुदानित सिलिंडर ९ वरून थेट ४ वर!
नव्या नियमांनुसार, सरकारने आता उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या वार्षिक अनुदानित सिलिंडरची संख्या ९ वरून थेट ४ केली आहे.यापूर्वी लाभार्थ्यांना वर्षाला ९ रिफिलवर प्रति सिलिंडर ३०० रुपये अनुदान (सबसिडी) मिळत होते. म्हणजेच वर्षाला एकूण २,७०० रुपयांचा आर्थिक लाभ मिळत होता.
आता नव्या नियमांनुसार लाभार्थ्यांना केवळ पहिल्या ४ रिफिल्ससाठीच (PMUY Update) प्रति सिलिंडर ३०० रुपये अनुदान दिले जाईल. यामुळे आता वार्षिक एकूण अनुदान फक्त १,२०० रुपये मिळेल. परिणामी, लाभार्थ्यांचे वार्षिक १५०० रुपयांचे नुकसान होणार आहे.
सिलिंडरच्या दरातही वाढ; आता किती मोजावे लागणार?
काही दिवसांपूर्वीच दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर दिल्लीत १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत ९४२ रुपये झाली आहे.
नव्या नियमांनुसार पहिले ४ सिलिंडर ३०० रुपये सबसिडी वजा जाता लाभार्थ्यांना प्रति सिलिंडर ६४२ रुपये पडेल.वर्षातील पहिले ४ सिलिंडर संपल्यानंतर, पुढील सर्व सिलिंडर लाभार्थ्यांना बाजाराभावाप्रमाणे (सध्याच्या दरानुसार ९४२ रुपये) पूर्ण किंमत देऊन खरेदी करावे लागतील.
२०१६ पासून सातत्याने कपात
२०१६ मध्ये जेव्हा पंतप्रधान उज्ज्वला योजना (PMUY Update) सुरू झाली, तेव्हा लाभार्थ्यांना वर्षाला तब्बल १२ सिलिंडरवर अनुदान दिले जात होते. मात्र, गेल्या काही वर्षांत सरकारने या संख्येत टप्प्याटप्प्याने कपात केली. आधी ही संख्या १२ वरून ९ करण्यात आली आणि आता थेट ४ वर आणली गेल्याने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावरील आर्थिक बोजा कमालीचा वाढणार आहे.





