पीएमपीला मिळणार नवीन तिकिट मशीन्स

पुणे – महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळविणाऱ्या “पीएमपीएमएल’ प्रशासनाला नादुरुस्त आणि जुन्या ई-तिकिट मशीन्समुळे नव्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यासंदर्भात वाहकांनी तक्रारी केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. त्यानुसार या मशीन्स बदलण्याची प्रक्रिया प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये नवीन मशीन्स उपलब्ध होणार असून त्याचे डेपोनिहाय वितरण करण्यात येणार आहे.

पीएमपीएमएल प्रशासनाने बदलत्या काळानुसार आपल्या कारभारात बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार तीन ते साडेतीन वर्षांपूर्वी छपाई तिकिटे बंद करून ई-तिकिट मशीन्सच्या माध्यमातून प्रवाशांना तिकिटे देण्यात येत आहेत. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने साडेचार हजार मशीन्सची खरेदी केली आहे. वास्तविक या मशीन्सची दरसहा महिन्यांनी देखभाल आणि दुरुस्ती करण्याची आवश्‍यकता आहे. त्यासंदर्भात संबंधित कंपनीने प्रशासनाला सूचना केली होती.

मात्र, गेल्या साडेतीन वर्षांत मशीन्सची एकदाही देखभाल आणि दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे या मशीन्स अक्षरश: भंगारात निघाल्या आहेत. चार्जिंग असतानाही अचानक बंद पडणे, तिकिटावरील अक्षर व्यवस्थित न येणे, तिकिट अर्धवट निघणे आदी त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यासंदर्भात बहुतांशी वाहकांनी प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.