पंतप्रधान मोदींचे विद्यार्थी व पालकांना ‘सरप्राईझ’

नवी दिल्ली – करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका भारताला बसला आहे. पहिल्या लाटेनंतर विषाणूचा संसर्ग कमी झाल्याने काहीसे पूर्वपदावर येत असलेले जनजीवन दुसऱ्या लाटेत पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे.

यामध्ये शाळांचा देखील समावेश असून विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा घरातूनच शिक्षण घ्यावे लागत आहे. अशातच आज केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सीबीएसई विद्यार्थी व त्यांच्या पालकांसोबत एक चर्चासत्र आयोजित केले होते.

या चर्चासत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय उपस्थिती लावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी पंतप्रधानांनी सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. उपस्थित विद्यार्थी व पालकांनी त्यांच्या अडचणी मनातील शंका पंतप्रधानांसमोर मांडल्या. त्यांच्या शंकांचे निरसन पंतप्रधान मोदींनी केले.

दरम्यान, ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रास पंतप्रधानांनी  अनपेक्षित उपस्थिती लावल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.