पुलवामा दहशतवादी हल्ला हा पंतप्रधान मोदींचा कट – काँग्रेस नेता 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ला हा पूर्वनियोजित कट असल्याचे मिझोरामचे माजी राज्यपाल आणि काँग्रेस नेते अजीज कुरेशी यांनी म्हंटले आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पुलवामा हल्ला घडवून आणला, असा थेट आरोप कुरेशी यांनी केला आहे.

अजीज कुरेशी म्हणाले कि, एक निर्धारित योजना आखून हा कट रचण्यात आला आहे. कारण तुम्हाला संधी हवी होती. परंतु, जनता समजदार आहे. ४२ जवानांची हत्या करून त्यांच्या राखेतून राजतिलक करावे, असे जरी मोदींना वाटत असले तरीही जनता त्यांना ते करू देणार नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.