राफेलच्या किंमतींबाबतचा पंतप्रधानांचा बचाव मोडला : राहुल गांधी

नवी दिल्ली – राफेल विमानांच्या मुद्दयावरून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. राफेल किंमतींच्या किंमतींबाबत पंतप्रधानांचा बचाव मोडून पडला आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

“एनडी’ सरकारचा राफेल करार हा “युपीए’ काळातील करारापेक्षा अधिक चांगल्या शर्तींवर झालेला नाही, असे एका इंग्रजी वर्तमानपत्राने म्हटले आहे. राफेल विमानांची तुलनात्मक स्वस्त किंमत आणि मिळण्याच्या कालावधीबाबतचे पंतप्रधानांचे दाव्यांबाबत एका वर्तमान पत्रातील वृत्ताचा हवाला देऊन राहुल गांधी बोलत होते. सरकारने यापूर्वी राफेल कराराबाबतचे सर्व आरोप आणि आक्षेप फेटाळले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राफेल विमानांच्या गुणवत्तेच्या परीक्षणासाठी 7 सदस्यांची तज्ञांची समिती होती. त्यामध्ये संरक्षण विभागातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोदी सरकारच्या काळात झालेला 36 राफेल विमान खरेदीचा व्यवहार “युपीए’ सरकारच्या काळातील 126 दासोल्ट विमानांच्या खरेदी करारापेक्षा अधिक सरस नसल्याचे म्हटले आहे. या आशयाचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे.

मोदी सरकारच्या काळातील या कराराविरोधात “युपीए’ अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, यांच्यासह कॉंग्रेस खासदारांनी संसदेच्या आवारातील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ “चौकीदार चोर है’ अशी घोषणाबाजी केली. या विमान खरेदीतील गैरव्यवहाराचा आरोप करताना कॉंग्रेस खासदारांनी हातात कागदी विमाने आणि फलक धरले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)