वाघोली : पुणे शहरालगत असणाऱ्या केसनंद गावच्या विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी देण्याची मागणी पीएमआरडीए आयुक्त यांच्याकडे ग्रामपंचायतीने वतीने करण्यात आली असल्याची माहिती सरपंच नितीन गावडे यांनी दिली.
याबाबत केसनंद ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन गावडे यांनी सांगितले की वाघोलीला विकासकामांसाठी पीएमआरडीएकडून कोटयावधींचा निधी मिळत असताना शेजारीच असलेल्या केसनंद गावाला मात्र अनेक प्रकल्प सुरू असताना अद्याप एकही रूपयाचा निधी मिळाला नसल्याची खंत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांसमोर मांडत केसनंदलाही विकास निधी देण्यात यावा अशी मागणी केली . पुणे महानगरपालीकेलगत असलेल्या केसनंद गावात नागरी वस्ती वेगाने वाढत असून सुमारे ३० हजार नागरीकांना सुविधा देताना ग्रामपंचायतीवर ताण येत आहे.
केसनंद गावात अनेक टाउनशिप प्रकल्प सूरू असून या प्रकल्पामार्फत पीएमआरडीएला मोठ्या प्रमाणात महसुलही मिळत आहे. मात्र येथे अद्याप एकही विकास काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे येत्या काळात पीएमआरडीए व ग्रामपंचायत केसनंद यांच्या संयुक्त विद्यमाने आवश्यक विकास कामांचे नियोजन तातडीने करण्यासाठी जास्त निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सरपंच नितीन गावडे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने केली आहे.
या कामांमध्ये प्रामुख्याने सांडपाणी व्यवस्थापनासाठी प्रकल्प उभारणी व केसनंद ते कोलवडी येथे मुळा-मुठानदीपर्यंत ड्रेनेज लाईन करणे, घनकचरा व्यवस्थापनासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणे, वाढत्या लोकसंख्येचा विचार करून स्वतंत्र नविन नळ पाणी पुरवठा योजना, वाघोली-केसनंद रस्ता रुंदीकरण, गावात उद्याने, क्रिडांगणे, अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, अंतर्गत बंदिस्त गटर योजना आदी कामांचा समावेश असल्याचे सरपंच नितीन गावडे यांनी सांगितले.
“वाघोली गावाप्रमाणे जास्तीत जास्त निधी देऊन पी एम आय डी ए ने देखील केसनंद मधील अनेक वर्षापासून चे प्रश्न सोडवण्यासाठी मोलाची मदत व सहकार्य करावे.” – प्रमोद हरगुडे
(ग्रामपंचायत सदस्य, केसनंद)