म्हाळुंगे-सूस रस्ता दुरुस्तीचे काम पीएमआरडीएच्या हाती

प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे – पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी म्हाळुंगे-सूस रस्ता दुरुस्तीचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हाती घेण्यात आले आहे.

हिंजवडीतील वाढते नागरीकरण लक्षात घेता या भागात स्थानिक व आयटीतील नागरिकांची रस्ता दुरुस्त करण्याची मागणी पीएमआरडीएकडे होत होती. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद यांच्याकडेही रस्त्याच्या दुरुस्तीबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पीएमआरडीएने म्हाळुंगे-सूस हा रस्ता दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले आहे. एमआयडीसीला रस्त्याच्या कामकाजासाठी टीपी स्कीमच्या माध्यमातून 36 मीटरची जागा बांधकामासाठी उपलब्ध करून दिली आहे. उर्वरित अडीच किलोमीटरमध्ये पीएमआरडीएने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पीएमआरडीएकडून अडीच किलोमीटर रस्त्याच्या कामकाजासाठी 7 कोटी 67 लाख रुपये खर्च येणार आहे.
याविषयी प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते म्हणाले, म्हाळुंगे-नांदेमधील वाहतूक सुसह्य करण्यासाठी व ग्रामस्थांना त्रासातून मुक्त करण्यासाठी पीएमआरडीएने पुढाकार घेऊन हे काम हाती घेतले आहे. स्थानिक ग्रामपंचायत, पीएमआरडीए व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने रस्ता दुरुस्तीचे कामकाज सुरू केले आहे. सदरील रस्ता पुढील सात दिवसांत करण्याचे नियोजन आहे. या भागातील ग्रामस्थांनी टीपी स्कीमसाठी देखील मोलाचे सहकार्य केले आहे. हिंजवडीचा विकास पाहाता भविष्यात म्हाळुंगे गावाचा विकास होणे महत्त्वाचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)