पुणे -पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गाचे कात्रजपर्यंत विस्तारीकरण करण्यास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. त्या पाठोपाठ हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी जाणार आहे. शिवाजीनगर न्यायालय ते लोणीकाळभोर हा 19 किलोमीटर लांबीचा, तसेच हडपसर ते सासवड आणि स्वारगेट-पूलगेट हा तीन किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गांचे विस्तारीकरणास मान्यता दिल्याने हा प्रस्ताव पीएमआरडीएकडून राज्य सरकारकडे मान्यतेसाठी
पाठविण्यात येणार आहे.
शिवाजीनगर ते लोणीकाळभोर हा इलेव्हेटेड मार्ग प्रस्तावित केला आहे. याशिवाय हडपसर ते सासवड रेल्वे स्टेशनपर्यंत आणि स्वारगेट ते पूलगेट असे नवीन मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यास “पुम्टा’ या समितीचीदेखील मान्यता मिळाली आहे. त्यामुळे हा अहवाल मान्यतेसाठी पाठविण्याची जवळपास सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या महिन्या अखेरपर्यंत हा प्रस्ताव रजाय सरकारकडे पाठविण्यात येणार आहे, असे पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.