पीएमपीची पुणे दर्शन सुसाट

पर्यटकांचा प्रतिसाद : उत्पन्नाला हातभार

पुणे – पुणे शहराच्या ऐतिहासिक वारसा ठिकाणांची सफर घडवणाऱ्या पुणे दर्शन’ याबस सुविधेमुळे पीएमपीच्या उत्पन्नाला हातभार लागत आहे.

शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांना भटकंती करणे सोपे व्हावे, या हेतूने पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पुणे दर्शन’ ही बससेवा चालविण्यात येते. या बसचा फायदा दरमहा सुमारे 800 ते 900 प्रवाशांना होतो.

दर दिवशी 36 आसनी एक बस सोडण्यात येते. मात्र उन्हाळ्यामध्ये 2 बसेस सोडण्यात आल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शहरातील सुमारे 10-15 ठिकाणे पर्यटकांना दाखविण्यात येतात. फक्त 500 रुपये तिकीट असणाऱ्या या बसेस दरदिवशी पीएमपीला सुमारे 25 ते 30 हजारांचे उत्पन्न मिळत असल्याने तोट्यात धावणाऱ्या बसेसला हातभार लागत आहे. मात्र, डेक्कन आणि पुणे स्टेशन या केवळ दोनच ठिकाणी बोर्डिंग पॉईंट्‌स’ असल्याने प्रवाशांकडून पॉईंट्‌स वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.

काय पाहता येते
बसेसची खडखड.. धुराचे लोट.. खचाखच गर्दीने भरलेल्या बसेस.. वारंवार बंद पडणाऱ्या बसेस अशी इमेज’ असणाऱ्या पीएमपीची पुणे दर्शन’ बस नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे. शनिवारवाडा, राजा केळकर संग्रहालय, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, आगाखान पॅलेस, सारसबाग, लाल महाल, शिंदे छत्री आदी शहरातील प्रसिद्ध ठिकाणे पर्यटकांना पाहता येतात. त्याचबरोबर बसमधील एसी’ची सुविधा आणि बसेसवर असणारे पुणे’ पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत

वर्षभर पुणे दर्शन’ ही बससेवा सुरू असते. मात्र उन्हाळा, दिवाळी आणि नाताळच्या सुट्टीमध्ये पर्यटकांची संख्या जास्त असते. शहरातील सुमारे 15 ठिकाणे मार्गदर्शकासह पाहता येत असल्याने पर्यटकांनी संख्या वाढत आहे. मे आणि जूनमध्ये पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे.
– अजय चारठाणकर, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×