नवघणे यांच्या मृत्यूला “पीएमपीएमएल’ जबाबदार

गलथान कारभारामुळे बळी : नातेवाईकांचा आरोप

पुणे – टिळक रस्त्यावर बुधवारी पीएमपीएमएल बसवर झाड कोसळून चालकाचा मृत्यू झाला होता. यामध्ये चालक विजय नवघणे यांचा मृत्यू प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे झाल्याचा आरोप करत त्यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह थेट पीएमपीएमएल कार्यालयात आणला. यावेळी प्रशासनाने तातडीने 2 लाख रुपये व अनुकंपातून कुटुंबातील व्यक्‍तीला नोकरी देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह घरी नेला.

टिळक रस्त्यावर स. प. महाविद्यालय चौकात ब्रेकडाऊन झालेली बस ओढून नेण्यासाठी पीएमपीएमएलची सर्व्हिस बस निघाली होती. यावेळी जोरदार पावसाने वडाचे झाड बसवर कोसळून चालकाचा मृत्यू झाला. पीएमपीच्या बस सतत ब्रेकडाऊन होत असून त्यांच्या चुकीमुळे चालकांचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. यामुळे नातेवाईकांनी ससून रुग्णालयातून मृतदेह पीएमपी कार्यालयात आणला.

यावेळी नातेवाईक संतप्त झाल्याने कार्यालयाच्या परिसरात अनुचित प्रकार घडू नये, याकरिता कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पीएमपीएमएलच्या अध्यक्षा व संचालिका नयना गुंडे यांनी नवघणे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच, पीएमपीएमएलकडून तातडीचे 2 लाखांची मदत जाहीर करून कुटुंबातील व्यक्‍तीला नोकरी देण्याचे आश्‍वासन दिले. दीनदयाळ अपघात विमा योजनेतून मदत देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.