पीएमपीला मिळणार 150 ई-बसेस

फेम इंडियाच्या फेज 2 मध्ये बसेस देण्यास केंद्राची मान्यता

पुणे – अवजड व सार्वजनिक उद्योग केंद्र सरकार यांचे “फेम इंडिया स्कीम’ अंतर्गत इलेक्‍ट्रीक बस फेज 2 मध्ये परिवहन महामंडळास 150 इलेक्‍ट्रीक बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळास मान्य केल्याची माहिती महापौर मुक्‍ता टिळक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेकडून पहिल्या फेजवेळी स्मार्ट सिटी अंतर्गत ई-बसेस घेण्यासाठी फेम फेज 1 मध्ये प्रस्ताव पाठवला होता. मात्र, त्यावेळी मुंबईसाठी या बसेस देण्यात आल्या.

इलेक्‍ट्रीक वाहनांचा प्रचार व प्रसार होण्याच्या अनुषंगाने “फेम इंडिया स्कीम’ अंतर्गत इलेक्‍ट्रीक बस फेज 2 अंतर्गत “एक्‍स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामध्ये शरहरांतर्गत व शहरामधील वाहतुकीसंदर्भात प्रस्ताव प्राप्त झाले होते. “फेम इंडिया स्कीम’ अंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेस चालना देण्यासाठी बस फेज 2 मध्ये 5,595 इलेक्‍ट्रीक बसेस 64 शहरे तसेच राज्य सरकार उपक्रम व परिवहन महामंडळे यांच्यासाठी शहरांतर्गत व शहरामधील वाहतूक संचलनासाठी मान्य केल्या आहेत.

इलेक्‍ट्रीक बस फेज 2 अंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून परिवहन महामंडळाने केंद्राकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यासाठी आयुक्‍त राव यांच्याकडून केंद्राकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. या प्रस्तावामध्ये परिवहन महामंडळाने सद्यस्थितीतील कार्यरत इलेक्‍ट्रीक बस सेवेच्या अनुषंगाने ई-बस संचलन, ई-बस चार्जिंग स्टेशन उभारणी याबाबत माहिती सादर केली होती. त्यास अनुसरून परिवहन महामंडळास 150 इलेक्‍ट्रीक बसेस देण्यास मान्यता मिळाली आहे. पीएमपीला ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्‍ट अंतर्गत या बसेस उपलब्ध होणार आहेत. तसेच प्रतिबस 55 लाख रुपये अनुदान मिळणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.