“पीएमपी’त संशयकल्लोळ; गैरव्यवहारांचा ठपका

PMPML, Pune

पुणे – पीएमपी बस तिकीट व्यवहारातील गैरप्रकार रोखण्यासाठी तीन वर्षांपासून स्वयंचलित मशीनद्वारे छापील ई-तिकीट देण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र, या प्रक्रियेत वाहकांनी “एरर तिकीट’ (कोरे तिकीट) काढून त्याद्वारे पीएमपीची अर्थिक फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या संशयावरुन पीएमपी प्रशासनाने 23 वाहकांना निलंबित केले.

पंचिग तिकिट रद्द करुन ई-तिकिट सुरू केले. या तिकीटावर प्रवासाचे अंतर, रक्कम, तिकीट क्रमांक, वेळ छापून येते. तसेच, या मशिनमध्ये बिघाड होण्याची (बॅटरी उतरणे) शक्‍यता वाटल्यास मशिनला “एरर तिकीट’ काढण्याचा पर्याय देण्यात आली आहे. अनेकदा मशीन हॅंग झाल्यास देखील वाहक “एरर तिकीट’ काढून त्याची तपासणी करतात.

मात्र, काही सेवकांनी याचा गैरफायदा घेतल्याचा प्रशासनाला संशय आहे. वाहकांनी मोठ्या प्रमाणात “एरर तिकीट’ काढून तीच तिकीट प्रवाशांना दिली आहेत. यासाठी कोऱ्या तिकिटांवर पेनाने रक्कम लिहून प्रवाशांकडून पैसे घेतल्याचे समोर आले आहे.

ई-तिकीट मशिनमध्ये तांत्रिक अडचणी येतात. यामुळे मशिन सुस्थितीत असल्याची तपासणी करण्यासाठी वाहक “एरर तिकीट’ काढतो. हा प्रकार काही दिवसांपूर्वी घडल्याने प्रशासनाने सरसकट वाहकांना निलंबित केले आहे. याबाबत प्रशासनाने निलंबन रद्द करुन चौकशी करावी.
– सुनील नलावडे, सरचिटणीस, राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन.


संचलनादरम्यान ई-तिकिटात गैरप्रकार केल्याच्या संशयावरुन 23 वाहकांचे निलबंन केले आहे. या कर्मचाऱ्यांची पुढील काही दिवसांत चौकशी करुन पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
– अजय चारठाणकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)