पीएमपी, एसटी, खासगी बससेवा मिळणार एकाच ठिकाणी

शेवाळवाडी येथे 8 एकर जागेवर नियोजन : केंद्र सरकार देणार निधी

पुणे – प्रवाशांना एकाच ठिकाणी एस.टी, पीएमपी आणि खासगी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध व्हावा, या उद्देशाने पुण्यातील पीएमपीएमएलच्या शेवाळवाडी डेपोजवळील आठ एकर जागेवर एक मॉडेल डेपो प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय निधी देणार आहे. यासंबंधी मंत्रालयाचे अधिकारी आणि पीएमपी प्रशासनामध्ये नुकतीच बैठक पार पडली आहे. शहरात सार्वजनिक सुलभ होण्यासाठी पीएमपीच्या जागेत स्वतंत्र डेपो उभारण्यात येणार आहे.

सध्या शहरात वाहतुकीसाठी पीएमपी बसेस आहेत. तर, शिवाजीनगर, स्वारगेट, पुणे स्टेशन परिसरातून एसटी बसेसची सोय आहे. मात्र, प्रवाशांना ही सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत प्रयत्न सुरू आहेत. सध्या शेवाळवाडी परिसरात पीएमपीचा सुमारे 4 एकर जागेवर डेपो कार्यरत आहे. याच परिसरात आणखी 4 एकर जागा असून त्याबाबत मंजुरी घेतली जाणार आहे. ही जागा उपलब्ध झाल्यास या ठिकाणी मॉडेल डेपो उभारण्याचा विचार करण्यात येत आहे.

बैठकीनंतर पीएमपी प्रशासन उपलब्ध जागा आणि इतर सेवा-सुविधांबाबत विस्तारित अहवाल केंद्र शासनाला पाठविला आहे. या अहवालाचा विचार करुन केंद्र शासन डेपो उभारण्यासाठी निधी उपलब्ध करुन देईल. यासाठी सुमारे दीड कोटी रुपये निधी मिळण्याची शक्‍यता आहे.

शेवाळवाडी परिसरातील उर्वरीत जागा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. ही जागा उपलब्ध न झाल्यास सुतारवाडी परिसरात महामंडळासाठीची आरक्षित जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

नागरिकांच्या सोईसाठी एकाच ठिकाणी एस.टी., पीएमपीएल आणि खासगी वाहतुकीसाठी डेपो उभारण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली असून उपलब्ध जागा, खर्च, सेवा-सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. लवकरच या प्रकल्पाबाबत अंतिम निर्णय होणार आहे.
– अजय चारठाणकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

1 COMMENT

  1. शेवाळवाडी येथे नागरिकांच्या सोईसाठी एकाच ठिकाणी एस.टी., पीएमपीएल आणि खासगी वाहतुकीसाठी डेपो उभारण्यात येणार आहे. हा निर्णय खरोखरच योग्य आहे. शहरात येणारे खाजगी वाहने व एसटी शहराच्या बाहेर थांबतील व शहरात येणाऱ्या प्रवाशांना पीएमपीएमएल मार्फत शहरवाहतूक सेवा देण्यात यावी. पीएमपीएमएल याहीपुढे जाऊन ओला उबेर सारखी टॅक्सी सेवा, रिक्षा सेवा देऊ शकले तर प्रवासी आनंदित होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)