पुणे – पीएमपी प्रशासनाने बंद केलेली पीएमआरडीए हद्दीतील 6 मार्गांवरील बससेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमपीने गेल्या महिन्यातच 13 मार्गांवरील सेवा बंद केली होती. त्याचवेळी पीएमआरडीए हद्दीतील या 6 मार्गांवरील देखील सेवा बंद करण्यात आली होती. पण एकाच महिण्यात पीएमपीने आपला निर्णय बदलला आहे.
पीएमआरडीए हद्दीतील न्हावी सांडस, कोंढणपूर, केंदूर, पाबळ, कडूस आणि यवत या सहा मार्गांवर 10 बस धावणार आहे. त्यामुळे पीएमआरडीए हद्दीतील प्रवाशांना जरी दिलासा मिळाला असला, तरी शहरातील प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पुणे शहरात आधीच बसेस कमी पडत असताना पीएमपीने पुन्हा शहराबाहेर बस का सुरू केल्या, असा सवाल पुणेकर विचारत आहेत.
दरम्यान, ग्रामीण भागात पुन्हा सेवा सुरू होत असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी 70 रुपयांचा पास पुन्हा सुरू करावा, अशी मागणी जोर धरीत आहे. तरी हापास पुन्हा सुरू होणार का, याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
पुन्हा सुरू केलेले मार्ग कंसात बस संख्या
न्हावी सांडस (1), कोंढणपूर (5), केंदूर (1), पाबळ (1), कडूस (1), यवत (1)