पीएमपीचा पासधारकांना दिलासा

डीजीलॉकरमधील ई-कागदपत्रे ग्राह्य धरणार
पुणे –
पीएमपीएमएल पास काढण्यासाठी तसेच प्रवासादरम्यान आवश्‍यक असलेली कागदपत्रे आता डिजीलॉकर वापरणाऱ्या प्रवाशांना सोबत बाळगण्याची गरज नाही. कोणत्याजी प्रवाशाने डिजी लॉकरमधील ई-कागदपत्रे दाखवल्यास ती पाससाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला आहे. तसेच, याबाबतचे स्पष्ट आदेश आणि सूचना पासविभाग आणि वाहकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनावधानाने कागदपत्र विसरलेल्या मात्र, डीजी लॉकर वापरणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळच्या बसेसमधून रोज दहा लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. यातील बहूतांश नागरिक दैनंदिन पास काढतात. तर, अनेक प्रवासी महिन्याचा पास काढून प्रवास करतात. पास काढतेवेळी पुरावा म्हणून आधाकार्ड, पॅनकार्ड आदी दाखवण्याची गरज असते. मात्र, अनेकदा नागरिकांकडे याचे मुळ कागदपत्रे जवळ नसतात.
त्यामुळे त्यांना पास नाकारला जातो. तसेच, कागदपत्रे डीजीटल स्वरुपात असली तरी, त्याबाबत प्रशासनाने निर्णय घेतला नसल्याने तसेच वाहकांना त्याची कोणतीही कल्पना नसल्याने पास नाकारला जातो. त्यावरून अनेक तक्रारी तसेच वादाचे प्रसंगही घडले आहेत. याची गंभीर दखल घेत शासनाच्या आदेशानूसार ई-कागदपत्रे स्विकारण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. याचा प्रवाशांना फायदा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)