पीएमपीचा हेल्पलाईन नंबरच “गायब’

पुणे – बसने प्रवास करताना अडचणी आल्यास पीएमपीने हेल्पलाईन नंबर सुरू केला होता. मात्र, बसस्थानकांवरील हेल्पलाईन नंबरच गायब झाले आहेत. तसेच, काही ठिकाणी नंबरवर जाहिराती लावल्याने ते दिसेनासे झाले आहेत.

शहरात पीएमपीचे 13 बसस्थानके आहेत. या स्थानकांवर प्रवाशांना अडचणी आल्यानंतर तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर लाल रंगात काढण्यात आला आहे. मात्र, बहुतांशी स्थानकांवर हेल्पलाईन नंबर पुसट अथवा दिसेनासे झाले आहेत. यामुळे प्रवाशांना तक्रार करायची झाल्यास संभ्रमात पडत आहेत.

अनेकदा पीएमपीच्या बस रात्री-अपरात्री बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. यावेळी प्रवाशांच्या सोईसाठी प्रत्येक प्रवाशाकडे हेल्पलाईन नंबर आवश्‍यक आहे. परंतु, पीएमपीच्या भोंगळ कारभामुळे बसस्थानकावरून हेल्पलाईन नंबर गायब झाले आहेत. हे हेल्पलाईन नंबर पुन्हा नव्याने बसस्थानकांवर लावावा, अशी मागणी प्रवासी ज्योत्स्ना निगडे यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.