पुणे – लॉकडाऊनमुळे पीएमपीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे बीआरटी मार्गांवर कार्यरत असलेल्या कंत्राटी ट्रॅफिक वॉर्डन आणि खासगी सुरक्षारक्षकांची सेवासेवा बंद आली आहे.
बीआरटी मार्गांत इतर वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी पीएमपीने खासगी ट्रॅफिक वॉर्डन, सुरक्षा रक्षकांची भाडेतत्त्वावर नेमणूक केली होती. मात्र, करोनामुळे पीएमपीची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे ही सेवा बंद करण्यात आली आहे.
लॉकडाऊनमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनासह इंधनासाठी लागणाऱ्या खर्चाचा विषय गंभीर आहे. पीएमपीला इतर वेळी एका दिवसाला मिळणारे दीड कोटीचे उत्पन्न सध्या महिनाभर बस रस्त्यावर धावूनदेखील प्राप्त होत नाही, त्यामुळे खर्चात बचत करण्याचा निर्णय घेतला आहे, असे पीएमपी प्रशासनाने म्हटले आहे.
————-