पुणे – “पीएमपीएमएल’च्या ताफ्यात नव्या बसेस दाखल झाल्याने जुन्या बसेस काढून टाकण्यावर भर दिला जात आहे. मागील महिन्याभरात आयुर्मान संपलेल्या 44 बसेस स्क्रॅप करण्यात आल्या. तर, येत्या आठवडाभरात आणखी 30 बसेस प्रस्तावित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
“पीएमपीएमएल’च्या ताफ्यात सध्या सुमारे 2 हजार बसेस आहेत. यातील बहुतांश आयुर्मान संपलेल्या आहेत. संचालक मंडळाने बसचे आयुष्य निश्चित केले आहे. त्यानुसार 12 वर्षे पूर्ण किंवा 8 लाख 40 हजार किलोमीटर धाव पूर्ण झाल्यानंतर आयुर्मान संपते.