पुणे – प्रविण झिटे व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व आयकॉन यांच्या संलग्नतेने आयोजित पहिल्या पीएमडीटीए-आयकॉन लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2021 स्पर्धेत 8 वर्षांखालील मुलांच्या गटात यशवंतराजे पवार, रिषभ अनुप, वीर गायकवाड या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आगेकूच केली.
एमएसएलटीए स्कूल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 8 वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत बिगरमानांकीत यशवंतराजे पवारने अव्वल मानांकित आरव बेलेचा 5-3 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. रिषभ अनुपने तिसऱ्या मानांकित कबीर गुंडेचा याचा 5-0 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. वीर गायकवाडने चौथ्या मानांकित आयुष्मान खरेचा 5-0 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.
10 वर्षांखालील मुलींच्या गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित सारा फेंगसेने तिसऱ्या मानांकित अनुष्का जोगळेकरचा 6-0, तर दुसऱ्या मानांकित श्रावि देवरेने चौथ्या मानांकित ओजसी देगमवारचा 6-2 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
8 वर्षाखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी :
यशवंतराजे पवार वि.वि.आरव बेले(1) 5-3;
रिषभ अनुप वि.वि.कबीर गुंडेचा(3) 5-0;
वीर गायकवाड वि.वि.आयुष्मान खरे(4) 5-0;
विहान सावंत(2) वि.वि.देव मूर्ती 5-2;
10 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी :
सारा फेंगसे(1) वि.वि.अनुष्का जोगळेकर(3) 6-0;
श्रावि देवरे(2) वि.वि.ओजसी देगमवार(4) 6-2;
10 वर्षाखालील मुले: उपांत्यपूर्व फेरी :
सर्वज्ञ सरोदे(1) वि.वि.शौर्य गदादे(7)5-0;
नील देसाई वि.वि.आरव मुळ्ये 5-0;
अथर्व बागडे(5)वि.वि.नील बोन्द्रे(4)5-3;
क्रिशय तावडे वि.वि.वेदांत जोशी 5-0.