पुणे – करोनाच्या आर्थिक संकटामुळे मिळकतकर वगळता महापालिकेच्या इतर सर्वच उत्पन्नाचे स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे, 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत महापालिकेस केवळ 3285 कोटींचा महसूल मिळाला असून आतापर्यंत त्यातील तब्बल 2993 कोटी रुपये खर्चही झाले आहेत. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत जेमतेम 250 ते 300 कोटी रुपयेच शिल्लक असताना, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आज महापालिकेचे 2021-22 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले आहेत. याचे थेट प्रक्षेपण पुणे मनपाच्या https://pmc.gov.in या संकेतस्थळ आणि https://facebook.com/PMCPune या फेसबुक पेजवर केले आहे
-
करोनाचे सावट असतानाही आयुक्तांनी गतवर्षीच्या अंदाजपत्रकापेक्षा 1420 कोटींनी वाढले अंदाजपत्रक
-
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून 2021-22 चे अंदाजपत्रक सादर 7 हजार 650 कोटींचे अंदाजपत्रक सादर