पीएमसी बॅंक घोटाळ्यातील तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी

मुंबई – मुंबईतील पीएमसी बॅंक घोटाळ्यांतील आरोपींना 23 ऑक्‍टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. यात बॅंकेचे कर्ज बुडवणाऱ्या एचडीआयएल कंपनीचा अध्यक्ष राकेश वधवान, त्याचा मुलगा सारंग वाधवान आणि पीएमसी बॅंकेचा माजी अध्यक्ष वरयामसिंग यांचा समावेश आहे.

यातील वधवान पितापुत्रांना 3 ऑक्‍टोबर रोजी आणि वरयामसिंग याला 5 ऑक्‍टोबर रोजी अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी संगनमताने किमान 4 हजार 355 कोटी रूपयांची घोटाळा केल्याचा आरोप आहे. रिझर्व्ह बॅंकेने या सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्याच्यावर प्रशासक नेमला आहे.

या बॅंकेच्या खातेदारांना आता 40 हजार रूपयांपर्यंतची रक्कम खात्यातून काढण्याची अनुमती प्रशासकाने दिली आहे. तथापी अद्यापहीं अनेक खातेदारांचे कोट्यवधी रूपये या बॅंकेत अडकून पडले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.