पीएमसी घोटाळा : मुंबईत आरबीआयच्या इमारतीबाहेर खातेधारकांचे आंदोलन

मुंबई – संपूर्ण देशात दिवाळीचा उत्साह पहायला मिळतोय. सगळीकडे उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. मात्र, मुंबईमध्ये पीएमसी बँक खातेधारकांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासमोर काळी दिवाळी साजरी केली. तब्बल 2500 कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी पीएमसी बँक खाते धारकांवर आरबीआयकडून निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यानंतर बँक खातेदारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

आज मुंबईतल्या बीकेसी येथील आरबीआयच्या इमारतीजवळ उभे राहून पीएमसी बँक खातेधारकांनी ‘काळी दिवाळी’ साजरी केली. आमच्यासाठी ही दिवाळी काळी दिवाळी ठरली आहे. आमचे पैसे कधी मिळणार याचे उत्तर लिखित स्वरुपात मिळत नसल्यामुळे त्यांनी हे आंदोलन केले. पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेचे (पीसीएम) सर्व व्यवहार रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाने ६ महिन्यांसाठी गोठवले आहेत. बँकेच्या व्यवहारांमध्ये अनियमितता आढळून आल्याने आरबीआयने ही कारवाई केली.

बँकींग नियामक कायद्याच्या कलम (३५ A) नुसार कारवाई करण्यात आल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एमडी, जॉय थॉमस यांनी सांगितले. रिझव्‍‌र्ह बँकेने पीएमसी बँकेवर निर्बंध घातले आहेत. पीएमसीमध्ये आरबीआयला अनियमितता आढळून आली. त्यामुळे बँकेत ग्राहकांचे पैसे अडकले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)