मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेच्या आर्थिक डबघाईला कारणीभूत ठरलेल्या हौसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्टक्चर लि.चे (एचडीआयएल) चेअरमन राकेश वाधवान, व्हा. चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवान यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेने गुरूवारी अटक केली.
याच बरोबर या कंपनीची साडेतीन हजार कोटी रूपयांची मालमत्ता गोठविली आहे. रिझर्व्ह बॅंकेने पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर 17 जणांवर लुक आऊट नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर तीन दिवसांनी ही कारवाई करण्यात आली. एचडीआयएलला मान्यतेपेक्षा अधिक कर्ज दिल्याचा बॅंकेचा आक्षेप आहे. याबाबात तपासासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असून बॅंकेचा संचित तोटा चार हजार 355 कोटीवर पोहोचला आहे.