PM-XI vs IND, 2-day Warm-up Match : सरावासाठी टीम इंडियाचे फलंदाज सज्ज, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान-XI शी आज लढत….

कॅनबेरा – ॲडलेडमधील दिवस-रात्र कसोटी सामन्यापूर्वी फलंदाजीचे संयोजन अंतिम करण्याच्या उद्देशाने शनिवारी (9:10 am IST) मनुका ओव्हल येथे सुरू होणाऱ्या दोन दिवसीय सराव सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान इलेव्हनशी सामना करेल. भारताने आतापर्यंत चार दिवस-रात्र कसोटी सामने खेळले आहेत. चार वर्षांपूर्वी ॲडलेडमध्ये भारताचा एकमेव पराभव झाला. त्यावेळी भारतीय संघ केवळ 36 धावांवर बाद झाला होता. यानंतर मात्र भारताने जोरदार पुनरागमन करत चार कसोटी सामन्यांची मालिका जिंकली. सूर्यास्ताच्या वेळी गुलाबी चेंडू खेळणे खूप आव्हानात्मक असते. सराव सामन्याला प्रथम श्रेणी सामन्याचा दर्जा नसल्याने भारतीय फलंदाजांना सराव करायला आवडेल. पर्थ कसोटी 295 धावांनी जिंकल्यानंतर भारतीय संघाचे मनोबल नक्कीच उंचावले असणार आहे.
The Indian Cricket Team were hosted by the Honourable Anthony Albanese MP, Prime Minister of Australia at the Parliament House, Canberra. #TeamIndia will take part in a two-day pink ball match against PM XI starting Saturday. pic.twitter.com/YPsOk8MrTG
— BCCI (@BCCI) November 28, 2024
पहिल्या कसोटीसाठी अनुपस्थित असलेला कर्णधार रोहित शर्मा आणि अंगठ्याच्या फ्रॅक्चरमधून बरा झालेला शुभमन गिल हे दोघेही संघात परतले आहेत. ज्यामुळे संघाच्या फलंदाजीच्या क्रमात बदल दाट होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या कसोटीला ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल हे सलामीचे फलंदाज आहेत, परंतु पण जैस्वाल आणि केएल राहुल यांनी पर्थ कसोटीत चांगली कामगिरी केली. अशा स्थितीत रोहित देखील तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येवू शकतो. तसे झाल्यास शुभमन गिलचा देखील फलंदाजीचा क्रम बदलण्याची शक्यता आहे.
सर्फराजला संधी मिळण्याची शक्यता कमी
भारताला हे प्रयोग सराव सामन्यातच करावे लागणार आहेत. हा फक्त दोन दिवसांचा सामना आहे ज्यामध्ये गोलंदाजांपेक्षा फलंदाजांना अधिक सरावाची गरज आहे. सर्फराज खान सारख्या फलंदाजांनाही हात आजमावायला आवडेल. मात्र, कोणी जखमी झाले तरच त्यांना संधी मिळू शकते. गिलने नेटमध्ये संघासोबत सराव केला. भारतीय संघ या दौऱ्यावर सराव सामने खेळत नाही, कारण ते सहसा स्पर्धात्मक नसतात. पंतप्रधान इलेव्हन संघाची कमान जॅक एडवर्ड्सच्या हाती आहे. या संघात ऑस्ट्रेलियाचे अंडर-१९ संघातील चार्ली अँडरसन, महाली बियर्डमन, एडन ओ’कॉनर आणि सॅम कोन्स्टास यांचाही समावेश आहे.
ICC Champions Trophy 2025 : भारतीय संघ पाकिस्तानात जाणार की नाही? सरकारने निवेदन केले जारी…
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसीद कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
ऑस्ट्रेलिया पंतप्रधान इलेव्हन : जॅक एडवर्ड्स (कर्णधार), चार्ली अँडरसन, महाली बेर्डमन, स्कॉट बोलँड, जॅक क्लेटन, एडन ओ’कॉनर, ऑली डेव्हिस, जेडेन गुडविन, सॅम हार्पर, हॅनो जेकब्स, सॅम कॉन्स्टास, लॉयड पोप, मॅथ्यू रेनशॉ, जेम्स रायन.

